Suzuki Burgman Street च्या खरेदीवर मिळत आहे ‘ही’ जबरदस्त ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकी निर्माता कंपनी Suzuki ने आपली Suzuki Burgman Street स्कूटरच्या खरेदीवर खास ऑफर देत आहे. कंपनीने फेस्टिव्ह सीजन लक्षात घेऊन ही ऑफर देत आहे. तुम्हीही जर स्कूटर खरेदी करायचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आज आम्ही तुम्हाला या स्कूटरवर मिळत असलेली ऑफर, किंमत आणि फीचर्स बद्दल माहिती सांगणार आहोत.

फीचर्स

Suzuki Burgman Street BS6 च्या समोरील बाजूस 90 व 90-12 54 ट्यूबलेस टायर्स आणि मागील बाजूस 90-10-10 ट्युलबेस टायर्स आहेत. या स्कूटरच्या इलेक्ट्रिकल सिस्टमविषयी बोलायचे झाले तर यामध्ये मेंटेनन्स फ्री 12 व्ही, 3 एएच बॅटरी देण्यात आली असून यात एलईडी हेडलाइटही देण्यात आली आहे.

इंजिन

Suzuki Burgman Street BS6 मध्ये 124cc चे 4 स्ट्रोक, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 6750 Rpm वर 8.7 PS पॉवर आणि 5500 Rpm वर 10 Nm टॉर्क जनरेट करते.

ऑफर आणि किंमत

Suzuki Burgman Street च्या खरेदीवर कंपनी 3,000 रुपयांपर्यंत मोफत अ‍ॅक्सेसरीज बेनिफिट्स देणार आहेत. कंपनीने या स्कूटरची प्रारंभिक किंमत 81,100 रुपये इतकी आहे.