
देशातील प्रसिद्ध वाहन निरामय कंपनी टाटा मोटर आज आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही Punch आज लॉन्च करणार आहे. या मायक्रो एसयूव्हीच्या लॉन्चिंग आधीच याची बुकिंग कंपनीने सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी याची प्रारंभिक किंमत 4 ते 5 पाच लाखादरम्यान ठेवू शकते. ही कार Pure, Adventure, Accomplished आणि Creative अशा चार प्रकारात उपलब्ध होणार आहे. चाल तर या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
डिझाइनमध्ये काय असेल खास?
या कारचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो पाहता ही कार ड्युअल-टोन म्हणजेच दोन रंगात पाहायला मिळत आहे. ही आगामी मायक्रो एसयूव्ही ALFA-ARC तयार करण्यात आली आहे. याचा इंपॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेजवर आधारित आहे. यात एलईडी डीआरएल आणि हेडलॅम्प बंपरवर स्लॅट्स देण्यात आले आहेत. यात बूटवर क्रोम फिनिश पंच लेटरिंग आणि एलईडी टेललाइट्समध्ये एक खास ट्राय-एरो पॅटर्न आहे.
फीचर्स आणि इंजिन
Tata Punch चे कॅबिन फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, फ्लॅट-बॉटम मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारख्या फीचर्सने सुसज्ज असेल. यात रेवोट्रॉन 1.2-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हेच इंजिन टाटा टियागो आणि टाटा अल्ट्रोजमध्येही देण्यात आले आहे.




























































