TVS Jupiter नवीन अवतारात उद्या होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी TVS ने गुरुवारी आपली सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर Jupiter ला नवीन अवतारात लॉन्च करणार आहे. याबाबत कंपनीनेच एका टीझर द्वारे माहिती दिली आहे. याचा टीझर पाहता नवीन Jupiter मध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. कंपनीचा हा नवीन मॉडल दिसायला अधिक स्पोर्टी आहे. चला तर या स्कूटर बद्दल अधिक माहित जाणून घेऊ…

टीझर इमेजमध्ये LED DRL स्वतंत्रपणे पाहिले जाऊ शकते. जे दुचाकीच्या पुढील एप्रनवर ठेवलेले आहे. कंपनीने अद्याप या आगामी दुचाकीची तांत्रिक माहिती जाहीर केलेली नाही. परंतु अशी अपेक्षा केली जात आहे की, या स्कूटरमध्ये NTorq 125 मध्ये असलेलेच इंजिन दिले जाऊ शकते. तसेच ज्या प्लॅटफॉर्मवर NTorq 125 तयार करण्यात आली आहे, त्याच प्लँटफॉर्मवर नवीन Jupiter बनवण्यात आली असावी. गुरुवारी ही स्कूटर लॉन्च झाल्यानंतरच याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.

कंपनीने नुकतीच 125cc सेगमेंटमध्ये ‘ही’ स्कूटर केली आहे लॉन्च

Tvs Jupiter 125 स्कूटरच्या लॉन्चिंगसह 125cc सेगमेंटमध्ये बाजारात आपली स्थिती मजबूत करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने अलीकडेच 125cc सेगमेंटमध्ये आपली नवीन Raider 125 स्कूटर लॉन्च केली आहे. नवीन Raider 125 स्कूटरमध्ये कंपनीने 3 – वाल्व 124.8 cc एअर कुल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 7,500 rpm वर 11.2 bhp ची पॉवर आणि 6,000 rpm वर 11.2 Nm टॉर्क जनरेट करते.