युवा नेमबाज अवनीचा अचूक निशाणा, पॅरालिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी पहिलीच हिंदुस्थानी महिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

10 मीटर एअर रायफल एसएच वन या प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱया हिंदुस्थानच्या 19 वर्षीय अवनी लेखरा हिने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली. 50 मीटर रायफल थ्री पोझिशन एसएच वन या प्रकारात या महिला नेमबाजाने कास्य पदकावर नाव कोरले. पॅरालिम्पिकच्या इतिहासात दोन पदके जिंकणारी हिंदुस्थानची ती पहिलीच महिला खेळाडू ठरली हे विशेष. तसेच एका पॅरालिम्पिकमध्येही दोन पदके जिंकणारी अवनी लेखरा ही हिंदुस्थानची पहिलीच महिला खेळाडू ठरली. अवनी लेखरा हिने 445.9 गुणांसह कास्य पदकावर हक्क सांगितला. चीनच्या झँग क्युपिंग हिने 457.9 गुणांसह पहिले स्थान पटकावले. अर्थातच तिने सुवर्ण पदक पटकावले. जर्मनीच्या नताश्का हिल्ट्रोप हिने 457.1 गुणांसह रौप्य पदक जिंकले.

एकापेक्षा जास्त पदक जिंकणारे हिंदुस्थानी खेळाडू

  • जोगिंदर बेदी (अॅथलेटिक्स)
    1984 (एक रौप्य, दोन कास्य)
  • देवेंद्र झाझरीया (अॅथलेटिक्स)
    2004 (सुवर्ण)
    2016 (सुवर्ण)
    2021 (रौप्य)
  • मरीयप्पन थांगवेलू (अॅथलेटिक्स)
    2016 (सुवर्ण)
    2021 (रौप्य)
  • अवनी लेखरा (नेमबाजी)
    2021 (सुवर्ण, कास्य)