अविनाश चव्हाण खून प्रकरण : आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभय मिरजकर । लातूर

खासगी शिकवणी संचालक अविनाश चव्हाण यांच्या खून प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अविनाश चव्हाण याची रविवारी मध्यरात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणी पोलिसांनी पूर्वी भागिदार असलेल्या प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा या मास्टर माईंडला अटक केली. त्यानेच २० लाखाची सुपारी दिली होती. भाजप पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा आंगरक्षक म्हणून काम केलेल्या किरण गहेरवार यानेच हा गेम केला. त्याच्या सोबत असणारा अक्षय शेंडगे, मध्यस्थ महेशचंद्र गोगडे (रेड्डी), शरद घुमे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि २ लाख ३१ हजार रोख जप्त करण्यात आले.

बुधवारी पाचही आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्यातून देण्यात आली.