गोड खाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फाॅलो करा ‘या’ साध्या सोप्या टिप्स

गोड पदार्थ म्हणजे अनेकांचा जीव की प्राण.. गोड पदार्थांचे सेवन करण्यामुळे मात्र डायबेटीज होण्याचा धोका असतो. अशावेळी गोड न खाणे हाच एक उत्तम पर्याय मानला जातो. अधिक प्रमाणात गोड खाल्ल्याने मधुमेहासारख्या धोकादायक आजाराला आमंत्रण मिळते. यामुळे आपल्या शरीरामध्ये जळजळ वाढू लागते. तसेच लठ्ठपणा वाढू लागतो. म्हणूनच गोड खाण्यावर नियंत्रण मिळवणे हाच सर्वात उत्तम पर्याय आहे.

आपल्या शरीरासाठी कोणती डाळ खाणे चांगले आहे हे जाणून घ्या

सँडविचिंग पद्धत म्हणजे जर तुम्हाला गोड खायचे असेल तर जेवणाच्या शेवटी खाऊ नका, तर जेवणाच्या मध्येच खा. जेवणाच्या शेवटी गोड खाण्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा गोड खावेसे वाटत राहते. म्हणूनच प्रथम सॅलड खा, भाज्या, डाळी खा आणि या पदार्थांच्या मध्ये गोड पदार्थ खा यामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होते.

 

शरीरात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात? जाणून घ्या

तुम्हाला दिवसभरात वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल तर, सकाळीच एखादे फळ खायला हवे. केळी किंवा कोणतेही गोड फळ खाल्ल्यास दिवसभर गोड खाण्याची इच्छा कमी होईल.

स्वतःला समाधानी ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे एखाद वेळी गोड खाण्याची इच्छा झाल्यास जेवल्यानंतर, दोन बदाम आणि खजूर खा. असे केल्याने मन तृप्त होते आणि जिभेचे चोचलेही पुरवता येतात.

कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे