
सामना ऑनलाईन । नागपूर
स्पाईटजेट कंपनीच्या विमानाने नागपूर येथे केलेल्या इमर्जन्सी लँडिंगमुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. पण अखेर, नऊ तासांच्या खोळंब्यानंतर स्पाईसजेटचे प्रवासी नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत.
तांत्रिक बिघाड झाल्याने बंगळुरु-दिल्ली विमानाने नागपूर विमानातळावर इमर्जन्सी लॅण्डिंग केले होते. तेव्हापासून पर्यायी विमानाची वाट पाहत प्रवासी नागपूर विमानतळावर अडकले होते. बेंगळुरूवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे नागपूरमध्ये लँन्डिंग करावे लागले. विमानामध्ये झालेल्या काही तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दिल्लीला जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी दुसरे विमान बोलवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पण रात्रीपासून प्रवासी नागपूर विमानतळावरच होते. शुक्रवारी दुसरे विमान नागपूरला आले. तब्बल नऊ तासानंतर हे विमान प्रवाशांना घेऊन दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.






























































