
सामना प्रतिनिधी । मेहकर
मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी मैदानावर बसून ‘मतदान करा’ हा शब्द तयार करून मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे.
जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा अंत्री देशमुख तालुका मेहकर जिल्हा बुलढाणाच्या वतीने आगामी १८ एप्रिल २०१९ रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून GO VOTE ही व्यापक जाणीव जागृती व प्रचार मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून अंत्री देशमुख येथील जिल्हा परिषद शाळेत मानवी साखळी तयार करून मतदान करा असे आवाहन करण्यात आले आहे. गावातील नागरिकांनी सर्वांनी मतदान करावे व सर्वांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे; यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली कुलकर्णी, शिक्षक एम.एस. राजपूत, जी. एस. अंभोरे, डी. एस. डव्हळे, एस. एम. मोरे, आर. जे. गुंगे, के. पी. निकस, एस. ए. पातळे, जे. बी. अवचार, डी. आर. चांगाडे, पी. एस. डव्हळे आणि जी. के. देशमुख यांनी या कामी सक्रिय सहभाग घेतला.
































































