
अयोध्या जंक्शनचे नामकरण करण्यात आले आहे. आता याला ‘अयोध्या धाम जंक्शन’ या नावाने ओळखले जाणार आहे. 22 जानेवारी 2024 ला राम मंदिरात होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची चर्चा सुरू असतानाच हे नामकरण करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 डिसेंबरला अयोध्येतील नवीन एअरपोर्ट आणि नवीन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत. अयोध्या धाम रेल्वे स्टेशनहून वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर 1 जानेवारीपासून अयोध्या रेल्वे स्टेशन सार्वजनिक केले जाणार आहे. दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रेल्वे स्टेशनचे नाव अयोध्या धाम स्टेशन करण्याची इच्छा बोलून व्य्कत केली होती.
























































