राम मंदिराच्या उद्घाटनाआधी अयोध्या स्थानकाचे नाव बदलले, आता ‘हे’ असेल नवीन नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर अनेक शहरांची आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. याच यादीत आता एका नवीन नावाची भर पडली आहे. अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘अयोध्या धाम’ जंक्शन करण्यात आले आहे.

अयोध्या जंक्शनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आणि अयोध्या ते दिल्ली वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशात येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापुर्वी अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या जंक्शनची पाहणी केली होती. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम करण्याची इच्छा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. यानंतर बुधवारी अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम करण्यात आले.

22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून लाखोंच्या संख्येने भाविक राम नगरी अयोध्येत दाखल होतील.