आयुषमान खुरानाची स्वप्नपूर्ती; मुंबईत घेतलं नवीन घर, किंमत जाणून व्हाल थक्क…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या प्रकारचे चित्रपट अभिनेता आयुषमान खुराणा करत आहे, त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसत आहे. आज तो बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अलीकडेच त्याचा ‘चंडीगढ़ करे आशिकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्यात त्याच्या अभिनयासाठी चाहत्यांकडून त्याच भरभरून कौतुक केलं जात आहे. याच दरम्यान आयुषमान संदर्भात एक वेगळी बात समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनच आयुषमानच स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. त्याने मुंबईत आपल्या हक्काचं घर घेतलं असून तो लवकरच आपल्या कुटुंबियांसोबत यात शिफ्ट होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आयुष्यमानने मुंबईतील अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये हे घर खरेदी केलं आहे. मागील वर्षीच त्याने या घराची नोंदणी केली होती. जयसाठी त्याला 96 लाख रुपये स्टँप ड्युटी भरावी लागली होती. या घराची किंमत ऐकून अनेकांच्या भुवळ्या उंचू शकतात.

मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, आयुषमान खुरानाचे हे नवीन खार कमीत कमी 19 कोटींचे असावे. ज्यात तू लवकरच आपली पत्नी ताहिरा कश्यप आणि मुलांसह शिफ्ट होणार आहे. अलीकडेच अनेक सेलिब्रिटींनीही मुंबईत घर विकत घेतले असून आता या यादीत आयुष्मान खुरानाचे नावही जोडले गेले आहे. आयुष्मान खुरानाच्या या नवीन अपार्टमेंटमध्ये त्याला चार वाहनांसाठी पार्किंगची जागाही मिळाली आहे.

चंदिगड करे आशिकीनंतर आता आयुष्मान ‘अनेक’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे, या चित्रपटात विकास शर्मा आणि शेफाली गांगुली देखील दिसणार आहेत. याशिवाय तो ‘डॉक्टर जी’ या आणखी एका मनोरंजक चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चर्चा आतापासूनच रंगत आहेत. कारण या चित्रपटाचा आशय आणि विषय खूपच वेगळा आहे.