
सुप्रसिद्ध पंजाबी गायक बी प्राक याला लॉरेन्स बिश्नोई गँगने खंडणीसाठी धमकी दिली आहे. बिश्नोई गँगने बी प्राक याच्याकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली असून पैसे न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
बॉलीवूड आणि पंजाबी संगीत क्षेत्रातील कलाकारांना खंडणीसाठी लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. याआधी खंडणीसाठी खूनही झाले आहेत. अशात प्रसिद्ध गायक बी प्राक याला लॉरेन्श बिश्नोई गँगने खडणीसाठी धमकी दिली आहे. बी प्राक याला सहकारी गायक दिलनूर याच्या मार्फत ही धमकी देण्यात आली आहे.
दिलनूर यांना 5 जानेवारी रोजी एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून दोन मिस कॉल आले होते. 6 जानेवारीला दुपारी त्याच नंबरवरून फोन आल्याने दिलनूर यांनी तो उचलला. मात्र संशय आल्याने त्यांनी तो कट केला. त्यानंतर त्यांना एक ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवण्यात आली. मेसेज पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई अशी करून दिली.
बी प्राकला सांग की आम्हाला 10 कोटी रुपये हवे आहेत. तुझ्याकडे 1 आठवड्याचा वेळ आहे. तू जगातील कोणत्याही देशात गेलास, तरी तुझ्याशी संबंधित कोणीही आम्हाला सापडलं तर आम्ही त्याचा बंदबोस्त करू. याला बनावट कॉल समजू नकोस. त्याने सहकार्य केलं तर ठीक, नाहीतर त्याला जमिनीत गाडून टाकू, अशी धमकी ऑडिओ मेसेजद्वारे देण्यात आली.
धमकी मिळाल्यानंत दिलनूर यांनी 6 जानेवारी रोजी मोहालीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.




























































