बाहुबलीच्या प्रीक्वेलमध्ये ‘ही’ मराठी अभिनेत्री साकारणार शिवगामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बाहुबलीचा सिक्वेल बघितल्यानंतर प्रेक्षकांना प्रीक्वेल बघायला मिळणार आहे. म्हणजे महिश्मतीच्या साम्राज्याला भेट देण्याची आणि शिवगामीचा प्रवास जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रीक्वेलमध्ये शिवगामीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवगामीची भूमिका साकारणार आहे.

मृणालसोबत राहुल बोस, अतुल कुलकर्णी, वकार शेख, जामील खान, सिद्धार्ध अरोरा, अनुप सोनी हे देखील कलाकार विविध भूमिका साकारताना पाहायला मिळतील.

नेटफ्लिक्सवर ‘बाहुबली- बीफोर द बिगिनिंग’ ही बेवसीरिज सुरू होणार आहे. आनंद निलकांता यांच्या ‘द राईज ऑफ शिवगामी’ या पुस्तकावर आधारित ही वेबसीरिज आहे.