
कानपूरमध्ये 3 जून रोजी उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने ‘बाबा बिर्याणी’चा मालक मुख्तार बाबाला अटक केली आहे. बाबाने दगडफेक करणाऱयांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी हिंसाचाराचा मास्टरमाइंड हयात जाफरला पैसे पुरवले होते, असा आरोप आहे. एसआयटीच्या रडारवर आणखी लोक असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.






























































