हत्तीच्या पिल्लाने वाचवले बुडणाऱ्याचे प्राण, पाहा व्हिडीओ

2141

सुपाएवढे कान आणि लांब सोंडेचा महाकाय प्राणी म्हणून आपल्या सगळ्यांनाच हत्ती या प्राण्याचं कुतूहल असतं. अत्यंत हुशार म्हणून गणला जाणारा हा प्राणी तितकाच प्रेमळ आणि संवेदनशीलही असतो. एका हत्तीच्या पिल्लाच्या व्हायरल व्हिडीओला पाहून तुम्हाला याची खात्री नक्कीच पटेल.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच गाजतोय. या व्हिडीओत नदीच्या प्रवाहात वाहून चाललेला एक माणूस दिसतो. माणूस वाहत चाललेला पाहून नदीच्या काठावर उभ्या असलेल्या हत्तीच्या कळपातील एक पिल्लू पुढे सरसावतं आणि नदीच्या प्रवाहात उतरतं. नदीच्या प्रवाहात उतरल्याबरोब्बर ते वाहून चाललेल्या माणसाच्या दिशेने पोहत जातं आणि त्याला सोंडेचा आधार देऊन काठावर घेऊन जातं.

हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी हत्तीच्या पिल्लाचं कौतुक केलं आहे. एखाद्या संकटाची जाणीव, दाखवलेलं प्रसंगावधान आणि दुसऱ्या जीवासाठी असलेली संवदेनशीलता यांना पाहून माणूसच इतका क्रूर आहे, अशी टीका नेटकरी करत आहेत. माणूस हस्तिदंतासाठी हत्तींना मारतो, पण एका हत्तीच्या पिल्लाने मात्र जिवाची पर्वा न करता माणसाचा जीव वाचवला आहे. मग माणूस इतका कृतघ्न का होतो, असा मार्मिक सवाल नेटकरी विचारत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या