
अनेकदा घाईगडबडीने हातातून वस्तू पडतात, मात्र असे वारंवार घडल्यास त्याचे परिणाम नकारात्मक असू शकतात. जोतिषशास्त्रानुसार, काही वस्तू व्यक्तिच्या हातातून सारख्या निसटून पडत असतील त्यामुळे ठरवलेली कामे न होणे, अयशस्वी होणे याचे संकेत असू शकतात. जेव्हा आपल्या हातून एखादी वस्तू नकळतपणे निसटून पडते त्यामुळे कोणते नुकसान होऊ शकते, जाणून घेऊया.
मीठ
मीठ डायनिंग टेबलवर सतत पडत असेल, तर वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. अशा व्यक्तिंचे त्यांच्या जोडीदारासोबत सतत भांडण होणे, दाम्पत्य जीवनात समस्या येणे, अशा घटना घडू शकतात.
तेल
तुमच्या हातातून तेल सारखं सांडत असेल, तर भविष्यात एखादे संकट येण्याची शक्यता असू शकते. एवढेच नाही तर ते व्यक्ती कर्जबाजारी होण्याचे लक्षणही असू शकते. त्यामुळे सतत हातातून तेल सांडत असेल तर ही सवय टाळण्यासाठी प्रयत्न करा.
पूजेचे ताट हातातून पडणे
जर तुमच्या हातून पूजेचे ताट सारखं पडत असेल, तर हाही एक अशुभ संकेत आहे. याचा अर्थ पूजेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही, असाही असू शकतो. घरात एखादी नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यताही असू शकते. काही वेळा वास्तुदोषामुळेही असा प्रसंग वारंवार घडू शकतो.
दूध सांडणे
हातातून दुधाचा ग्लास निसटून जमिनीवर पडणे किंवा कढ आलेले दूध वारंवार ऊतू जाणे हाही अशुभ संकेत आहे. दुधाचा संबंध चंद्राशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, दूध हातातून पडल्याने जीवनात आर्थिक संकट येऊ शकते.

























































