
सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी अटकेत असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदावर्ते यांच्यासह 115 एसटी कर्मचाऱ्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी या सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आज सदावर्तेसह 115 एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
गुणरत्न सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलीसांच्या कोठडीत आहेत. ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत असल्याने सध्यातरी त्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे जामीन मिळाल्यानंतर त्यांची मुक्तता झालेली नाही.
































































