गिरगावात मेट्रोविरोधी आंदोलन करणार्‍या पाच शिवसैनिकांना जामीन

840

गिरगावातील मेट्रो-3 प्रकल्पामुळे होणार्‍या वाहतूककोंडीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार्‍या पाच शिवसैनिकांना मंगळवारी जामीन मिळाला.

गेल्या वर्षभरापासून गिरगावात मेट्रो-3 प्रकल्पाचे काम सुरू आहे. डिबी रिऑलिटी या खासगी विकासकाचेही काम सुरू आहे. या सर्व बांधकामांमुळे गिरगावकरांचे प्रचंड हाल होत आहेत. गिरगावकरांना रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे. डंपरसारख्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे दिवसा मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. शिवसेनेने अनेकवेळा इशारा देऊनही अवजड वाहनांची वाहतूक थांबली नाही. अखेर सोमवारी रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शेकडो गिरगावकरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्या पाच शिवसैनिकांना व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केली. या पाच जणांची आज जामिनावर सुटका झाली. यश काटे, आदित्य नायकोडी, पवन धोत्रे, मिलिंद झोरे, रोहिदास मांडवे अशी त्यांची नावे आहेत. त्यांना आज गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. त्यांच्या वतीने ऍड. चेतन बने यांना काम पाहिले.

आपली प्रतिक्रिया द्या