बाजारात येणार आता नॅनोपेक्षाही ‘क्यूट’ गाडी

36

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बाजारात जेव्हा नॅनो नावाची गाडी येणार अशी घोषणा झाली तेव्हा अनेक मध्यमवर्गीयांचा आनंद ओसंडला होता. अवघ्या एक लाखात गाडीचं स्वप्न त्यानंतर अनेकांनी पूर्णही केलं होतं. पण आता नॅनोपेक्षाही छोटी गाडी हिंदुस्थानात येऊ घातली आहे. या गाडीचं नाव आहे क्यूट.

बजाज या कंपनीने बनवलेली ही क्यूट गाडी प्रथमतः 2012मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये ठेवण्यात आली होती. 2016मध्ये या गाडीचं नेहमीच्या वापरासाठीचं मॉडेलही लाँच करण्यात आलं. मात्र वाहतुकीच्या नियमांमुळे ही गाडी अद्याप वापरात आणण्याची परवानगी नव्हती. पण, आता ही गाडी लवकरच रस्त्यांवर फिरताना दिसणार आहे.

या गाडीचा प्रकार क्वाड्रीसायकल असा आहे. हा साधारण तीनचाकी रिक्षा आणि चारचाकी या दोन्ही प्रकारांच्या दरम्यान असणारा गाडीचा प्रकार आहे. या गाडीचं इंजिन 216 सीसी, सिंगल सिलिंडर आणि ट्वीन स्पार्क असलेलं आहे. हे इंजिन मोनो-फ्युअल म्हणजे एक इंधन प्रकारात मोडतं. जिथे तुम्ही फक्त पेट्रोल किंवा सीएनजी यातला एकच पर्याय निवडू शकता. या गाडीला पाच स्पीडचा गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या गाडीचा आकार टाटा कंपनीच्या नॅनो गाडीहूनही छोटा असून ती लवकरच बाजारात लाँच केली जाणार आहे. बजाज क्यूटच्या पेट्रोल मॉडेलची किंमत 2.64 लाख इतकी असून सीएनजी मॉडेलची किंमत 2.84 लाख इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या