
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना, युवासेना विभाग क्रमांक-12च्या वतीने विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये भव्य रोजगार मेळावा, कोविड योद्धे आणि विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
रोजगार मेळावा
बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून शिवसेना, युवासेनेने टीम लीड आणि उडाण 505 यांच्या सहकार्याने शनिवार 16 जानेवारी रोजी दोन हजार विविध पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला असून येथे थेट मुलाखती घेऊन तत्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.
या रोजगार मेळाव्यात मुंबईतील 25 नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. पाचवी ते नववी उत्तीर्ण, एसएससी, एचएससी, पदवीधर, अभियांत्रिकी आणि आयटी क्षेत्रातील उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दक्षिण मुंबईतील शिवसेना शाखा किंवा मिलिंद झोरे – 7045416345, महेंद्र कांबळे – 9819046203, रोहित महाडिक – 7045 416245, रत्नेश पाटील – 8169665241, प्रशांत धनावडे – 8082726733 यांच्याशी संपर्क साधावा.
कोविड योद्धे, ज्येष्ठांचा सन्मान
कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी आणि कोविड रुग्णवाहिका कर्मचारी सातत्याने काम करत आहेत. त्याची दखल घेत चंदनवाडी विद्युत दाहिनी, सोनापूर स्मशानभूमी, बडा कब्रस्तान व वाळकेश्वर येथील स्मशानभूमीत काम करणाऱया कामगारांचा सन्मान मंगळवार 19 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता श्री राम मंदिर हॉल, तिसरा कुंबारवाडा येथे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
तसेच 23 जानेवारी रोजी प्रत्येक विभागातील 100 ज्येष्ठांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला खासदार अरविंद सावंत, खासदार, शिवसेना सचिव अनिल देसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजपुमार बाफना, उपनेत्या मीना कांबळी, विभागसंघटक जयश्री बाळ्ळीकर, युवासेनेच्या सचिव दुर्गा शिंदे उपस्थित राहणार आहेत.
























































