हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आयएएस अ‍ॅकॅडमीच्या प्रवेश परीक्षेस उस्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीच्या परीक्षेस आज संभाजीनगरात 480 विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली. मराठवाड्यातील ग्रामीण भागासह शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिव विद्या प्रबोधिनी संचलित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आय. ए.एस. अकॅडमीतर्फे महाराष्ट्रातील 1000 विद्यार्थ्यांना केंद्रिय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन केले जाते. त्याची प्रवेश पूर्व परीक्षा आज, 21 रोजी सकाळी 11 ते 1 दरम्यान आ.कृ. वाघमारे विद्यालयात सुरळीत पार पडली.

यावेळी परीक्षा केंद्रावर युवासेना जिल्हायुवाधिकारी ऋषिकेश खैरे, महाविद्यालय कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल, शहर युवाधिकारी किरण तुपे, सचिव अक्षय खेडकर, केंद्र संचालक अभिजित कुलकर्णी, डॉ. मोहन जोशी, उपशहर संघटक सुनीता औताडे, उपविभागप्रमुख हर्षवर्धन त्रिभुवन, उपशहर युवाधिकारी अँड. निलेश बोरखडे, विष्णू क्षीरसागर, मनोज क्षीरसागर, केतन साहुजी, मनीष मगरे, भूषण कोळी, निकिता जाधव, नयन जाधव, आदित्य निकम, योगेश मोरे, कौस्तुभ कुलकर्णी आदींसह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील परीक्षेचा निकाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलै रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.