
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिव विद्या प्रबोधिनीच्या बाळासाहेब ठाकरे आयएएस ऍकॅडमीमध्ये मोफत प्रशिक्षणासाठी घेण्यात येणार्या प्रवेश परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (नागरी सेवा) UPSC (Civil Servives) IAS, IFS,IPS,IRS अभ्यासक्रमाचे (1 वर्ष कालावधी) मोफत प्रशिक्षणासाठी रविवार, 21 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत मुंबईस राज्यभरातील इतर जिह्यांमध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल 27 जुलै www.svpias.com या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
गुणवत्ता यादीत येणार्या विद्यार्थ्यांनी सात दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करवी. तसेच प्रशिक्षणाबाबत संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रीयेची माहिती उपलब्ध असेल, अशी माहिती ऍकॅडमीचे संस्थापक-संचालक, शिवसेना उपनेते विजय कदम यांनी दिली. राज्यातील अधिकाधिक तरुण प्रशासकीय सेवेत यावे या हेतूने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या 28 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होईल
मुंबई : एस. आय आणि एस. एस. गर्ल्स हायस्कूल, चर्नी रोड, भाऊसाहेब हिरे कॉलेज-मलबार हिल, कीर्ती कॉलेज, दादर, साठये कॉलेज-विलेपार्ले, भवन्स कॉलेज-अंधेरी (प), जी. पी. एम डिग्री कॉलेज-अंधेरी (पू.), मरोळ प्रागतिक हायस्कूल-अंधेरी (पू.), चिल्ड्रन वेलफेअर सेंटर हायस्कूल ऍण्ड क्लारा कॉलेज ऑफ कॉमर्स-वर्सोवा, संस्कार कॉलेज-मालाड, आय. वाय कॉलेज-जोगेश्वरी, बालभारती कॉलेज-कांदिवली, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेज-दहिसर, एम. डी. कॉलेज-परेल, आचार्य-मराठे कॉलेज-चेंबूर, चेंबूर एज्युकेशन सोसायटी-अणुशक्ती नगर, एसआयईएस कॉलेज-शीव, शा. कृ. पंत पालावलकर शाळा-कुर्ला, झुनझुनवाला कॉलेज-घाटकोपर, संदेश कॉलेज-विक्रोळी, पराग हायस्कूल-भांडुप, केळकर कॉलेज-मुलुंड.
ठाणे : श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर-ठाणे (प), के. बी. वीरा हायस्कूल-डोंबिवली, बिर्ला कॉलेज-कल्याण, सी.एच.एम.कॉलेज-उल्हासनगर.
नवी मुंबई : युरो इंटरनॅशनल-ऐरोली, रामा भगत कॉलेज-नेरूळ.
पनवेल : के. एल. ई. कॉलेज-पनवेल.































































