बालमोहनच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘बोनस’, शाळेत स्पेशल स्क्रिनिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर येथील बालमोहन शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची निर्मिती, कला दिग्दर्शन असलेल्या बोनस चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग  शनिवारी सिटीलाईट सिनेमा येथे पार पडले. यावेळी 1964 पासूनचे विद्यार्थी तसेच शिक्षकही उपस्थित होते. यानिमित्त शाळकऱयांचा कौतुक सोहळा रंगला.

दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या शाळेच्या 1989 सालच्या दहावी ग बॅचमधून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी रतिश पाटील याने ‘बोनस’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. याच बॅचमधील अभिषेक रेडकर याने या चित्रपटाचे कला दिग्दर्शन केले आहे. या दोघांचे कौतुक करण्यासाठी बालमोहनच्या 1989 सालच्या बॅचने हा कार्यक्रम आयोजित केला. याच बॅचच्या प्रसाद महाडेश्वर, रश्मी वाळिंबे, किरण पटेल, आशीष नागपूरकर या चार विद्यार्थ्यांनी त्याचे नियोजन केले. यानिमित्त माजी विद्यार्थ्यांचे मेळा रंगला. शिक्षकही उपस्थित होते. बालमोहनशी संबंधित सर्वांचे कुटुंबीय, मित्रमंडळी यांना निमंत्रित करण्यात आले होते. अभिनेत्री पूजा सावंत हिच्या प्रमुख उपस्थितीत स्पेशल क्रिनिंग पार पडले. आपल्या शाळकऱयांच्या हातून घडलेल्या सुंदर कलाकृतींबद्दल रतिश पाटील अभिषेक रेडकर यांचे सर्वांनी भरभरून कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 28 फेबुवारी रोजी हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.