
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात बलुच नागरिकांवर होणाऱया अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱया महिला कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा पॅनडात संशयास्पद मृत्यू झाला आहे. रविवारपासून करीमा बलोच बेपत्ता होत्या. त्यांचा मृतदेह टोरंटोमध्ये आढळला.
वर्ष 2016 मध्ये बलोच स्टुडंट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी असताना करीमा बलोच यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानत एक भावुक व्हिडीओ जारी केला होता. त्यांच्या हत्येमागे पाकिस्तान असल्याचा आरोप करण्यात येत आहे. करीमा बलोच रविवार सायंकाळपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शेवटचे पाहिले गेले. करीमा यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह सापडला असल्याची माहिती दिली.






























































