पाकिस्तानमध्ये कसोटी खेळण्यास बांगलादेशचा नकार

566

श्रीलंकेचा क्रिकेट संघ दौऱयावर गेला म्हणून तब्बल 10 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी क्रिकेट खेळले गेले. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख एहसान मणी यांनी पाकिस्तानपेक्षा हिंदुस्थानच अधिक असुरक्षित असल्याचे सांगून स्वतःचे हसे करून घेतले होते. मात्र काही तासांमध्येच ‘पीसीबी’ अध्यक्ष तोंडावर आपटले आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळण्यास साफ नकार दिला आहे.

बांगलादेशचा संघ पाकिस्तानात फक्त टी-20 मालिका खेळेल असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. आम्ही पाकिस्तानमध्ये फक्त टी-20 मालिका खेळू. मात्र कसोटी मालिकाही ही त्रयस्थ ठिकाणीच खेळू’, असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष निझामुद्दीन चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या