बार्टीचे दोन विद्यार्थी रुग्णालयात दाखल

फेलोशिपच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे महिनाभरापासून बेमुदत धरणे आंदोलन करत आलेल्या दोन संशोधक विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहीत तिकोटे आणि जुही खोब्रागडे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. पुणे आणि मुंबई येथे सुरू असलेल्या संशोधकांच्या आंदोलनाला साडेचार महिने उलटले आहेत. पण गतिमान सरकार अशी जाहिरातबाजी करणाऱया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घोडे त्यांच्या हाती असलेल्या सामाजिक न्याय खात्यातच कसे अडते, असा सवाल बार्टी, सारथी आणि महाज्योतीचेही संशोधक करू लागले आहेत.