वन्यजीवांची आणखी एक रोमांचकारी कथा, पाहा आफ्रिकेची रिअल-लाइफ ड्रामा सिरीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन पात्रं, नवीन कथा, नवीन वळण, नवीन संकट, नवीन संघर्ष, पण त्याच अद्भुत सेटिंगसह सोनी बीबीसी अर्थ ‘सेरेंगेटी II’च्‍या माध्‍यमातून वन्यजीवांची आणखी एक रोमांचकारी कथा आणत आहे. शो आफ्रिकेच्या देशांतील प्रख्‍यात प्राण्यांच्या नाट्यमय आणि भावनिकपणे एकमेकांशी जोडलेल्या कथा दाखवतो. मानवी जीवनाशी प्राण्यांचे कसे आणि काय साम्य आहे हे ते शोधून काढतील. 6 एपिसोड्सची मालिका ‘सेरेंगेटी II’ 18 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजता सोनी बीबीसीवर प्रसारित होईल.

सिरीजचा दुसरा भाग बकरी, काळी सिंहिण, बिबट्यांचा प्रेमळ पिल्‍लांसोबतचा कळप आणि अनेक नवीन प्राणी पात्रं अशा आफ्रिकन वन्‍यजीवाच्‍या हृदयस्‍पर्शी कथांना दाखवतो. 6 एपिसोड्स या प्राणी पात्रांच्‍या विविध टप्‍प्‍यांना दाखवण्यासोबत त्‍यांच्‍या नात्‍यामधील अद्वितीय गतीशीलता, वर्तन, क्षमता व कमकुवतपणाचा उलगडा करतात. प्रत्‍येक एपिसोडमध्ये त्यांच्या जीवन प्रवासाच्‍या विभिन्‍न पैलूंना दाखवला जाईल.

या शोच्‍या प्रसिद्धीसंदर्भातील मोहीम ‘भूमी व सजीवांमधील नात्‍याचा अनुभव’ आहे. तसेच तरूण व सर्वसामान्‍य लोकांमध्‍ये शोची लोकप्रियता वाढवण्‍यासाठी सोनी बीबीसी अर्थ सोशल मीडिया प्रभावक व स्‍टार्ट-अप कॉमेडीयन्‍स – जोस कॅवेको व सोरभ पंत यांच्‍यासोबत सहयोगाने ब्रॅण्‍डेड कन्‍टेन्‍ट निर्माण करत आहे. वन्‍यजीवाच्‍या नाट्यमय कथांना विनोदी ट्विस्‍ट देत आपल्‍या विचारसरणीपेक्षाही अधिक प्राणी आपल्‍यासारखे आहेत या तथ्‍याला प्रकाशझोतात आणण्‍याचा मनसुबा आहे.

अत्‍याधुनिक कॅमेरा यंत्रणा, कलाटणी देणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेले आधुनिक ड्रोन्‍स यांचा वापर करत ‘सेरेंगेटी II’ सेरेंगेटी परिसंस्‍थेमधील प्राण्‍यांच्‍या व्‍यापक व सहानुभूतीपूर्ण दृश्‍याला सादर करतात.

पाहा ‘सेरेंगेटी II’ 18 ऑक्‍टोबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्‍त सोनी बीबीसी अर्थवर.