विश्वविजेतींना बीसीसीआयचे मोठे गिफ्ट, संघासाठी जाहीर केले एवढे कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत महिला क्रिकेटचे नवे जगज्जेते होण्याचा इतिहास रचला. महिला संघाच्या या विजयाने संपूर्ण हिंदुस्थानात जल्लोष झाला. या कामगिरीसाठी बीसीसीआयने देखील विश्वविजेतींना मोठे गिफ्ट दिले आहे. बीसीसीआयने महिलांच्या टीम इंडियासाठी 51 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.

1978 सालापासून सुरू झालेलं स्वप्न अखेर 47 वर्षांच्या दीर्घप्रतीक्षेनंतर हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या रणरागिणींनी साकारलं. टीम इंडियाच्या विजयानंतर डी.वाय. पाटील स्टेडियम फटाक्यांनी उजळून गेले होते. 2005 आणि 2017 मध्ये अंतिम सामन्यात मात खालेल्या टीम इंडियाने अखेर या सामन्यात बाजी मारत विश्वविजेतेपद पटकावले. शेफाली वर्माने आजच्या इतिहासाचे सुवर्ण पान आपल्या झंझावाती फलंदाजी आणि तितक्याच भन्नाट गोलंदाजीने लिहिले. पाया वर्माने रचला तर त्यावर जगज्जेतेपदाचा कळस दिप्ती शर्माच्या फिरकीने चढवला.

47 वर्षांची प्रतीक्षा संपली

महिला वर्ल्ड कपचा जन्म 1973 साली झालीत्यानंतर आतापर्यंत 12 वेळा वर्ल्ड कप खेळला गेला आणि त्यात वर्ल्ड कप आपलीच मक्तेदारी असल्याचे दाखवत ऑस्ट्रेलियाने तो सात वेळा आपल्याकडेच ठेवलाइंग्लंडने चार वेळा जिंकण्याचा पराक्रम केलातर न्यूझीलंडने 2000 साली पहिल्यांदा त्यावर आपला हक्क गाजवलाम्हणजे आतापर्यंत हे तीनच देश जगज्जेते ठरले होते आणि 25 वर्षांनंतर महिला क्रिकेटला हिंदुस्थानच्या रूपाने नवा जगज्जेता लाभलाविशेष म्हणजे हिंदुस्थानने 47 वर्षांच्या संघर्षानंतर महिला वर्ल्ड कपवर आपले नाव कोरण्याची किमया साधलीहिंदुस्थानी संघाइतकी प्रतीक्षा कुणालाही करावी लागली नाहीइंग्लंडने पहिल्याच स्पर्धेत आपले जेतेपदाचे स्वप्न साकार केले तर पुढच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन टीम जगज्जेती ठरलीन्यूझीलंडला आपले जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल 27 वर्षे वाट पाहावी लागली होती. 2000 साली त्यांनी आपली जगज्जेतेपदाची स्वप्नपूर्ती केली होती.

हिंदुस्थानला 47 वर्षे आणि दोन अंतिम सामन्यांतील पराभवानंतर हे यश संपादता आले आहेसर्वप्रथम 2005 साली आपण अंतिम फेरीत पोहोचलोपण ऑस्ट्रेलियाने आपल्याला चिरडले तर 2017 साली इंग्लंडने आपले स्वप्न धुळीस मिळवले होतेयंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतच पराभूत झाल्यामुळे हिंदुस्थानच्या मार्गातील मोठे अडथळे दूर झाले आणि हिंदुस्थानी महिलांनी वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.

कपिलधोनी आणि आता हरमनप्रीत

कधी एखादा खेळाडू फक्त सामना जिंकत नाहीतर इतिहास लिहितो आणि तो इतिहासात आता हरमनप्रीत काwरने लिहिला आहेआतापर्यंत हिंदुस्थान वन डे क्रिकेटमध्ये जगज्जेतेपद कपिलदेव आणि महेंद्रसिंग धोनीने पटकावले होतेआता त्या पंक्तीत हरमनप्रीतही बसली आहे.

हिंदुस्थानी संघाला अंतिम फेरी गाठून देणाऱ्या खेळाडूंच्या