दिल्लीकरांच्या नाकात दम, प्रदूषणामुळे जगणं मुश्कील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। दिल्ली

इराण, अफागाणिस्तान आणि हिंदुस्थानच्या राजस्थानमध्ये झालेल्या धुळीच्या वादळाचा परिणाम राजधानी दिल्लीला देखील भोगावला लागला आहे. धूळ आणि धुक्यामुळे धुरके तयार झाल्याने दिल्लीकरांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पाहायला मिळाले.

या धुरक्यामुळे दिल्ली सोबतच, नोएडा, गाजियाबाद आदी ठिकाणी देखील नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवला. हवामान विभागानुसार बुधवारी दिल्लीच्या वातावरणातील प्रदूषणामुळे पीएम १०चा स्तर ९८१, तर २.५ पीएमचा स्तर २०० इतका नोंदवला आहे. नोएडामध्ये पीएम १०चा स्तर ११३५ व पीएम २.५चा स्तर ४४४ आहे. तर, गाजियाबादमध्ये पीएम १०चा स्तर ९२२ व पीएम २.५चा ४५८ आहे. पुढील तीन दिवस अशाच प्रकारचे वातावरण राहील असा अंदाज दिल्लीच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान तज्ज्ञानुसार, इराण व दक्षिण अफगानिस्तानमधील धुळीच्या वादळाचा हा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.