
पोलीस आयुक्तालयात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या लोणी काळभोर पसिसरामध्ये आजपासून बीट मार्शल पेट्रोलिंग करणार आहेत. गुडी पाडव्याच्या मुहर्तावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बीट मार्शलांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी उपस्थित होते.
लोणी काळभोर परिसरात दिवसेंदिवस नागरिकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेचा आधार देण्यासाठी बीट मार्शलांकडून आजपासून पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे लोणी काळभोर, कदम-वाकवस्ती, कुंजीरवाडी, उरूळी-कांचन, उरूळी देवाची परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक दादा पवार, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, पंचायत समिती सदस्या हेमलता बढेकर, उरूळी कांचन गावचे सरपंच संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन उपस्थित होते.



























































