
जगातला सगळ्यात कठीण पदार्थ म्हणजे हिरा. अतिशय कठीण घनता असलेला हा पदार्थ अतिशय दुर्मिळ असतो. असाच एक दुर्मिळ हिरा गुजरातच्या सूरत येथे सापडला आहे. हा हिरा धडधडणाऱ्या हृदयासारखा दिसत असल्याने त्याला बीटिंग हार्ट असं नाव देण्यात आलं आहे. या हिऱ्याची चर्चा जगभरात आहे.
विशेष म्हणजे या हिऱ्यामध्ये एक नाही तर दोन हिरे आहेत. या हिऱ्याची खास गोष्ट म्हणजे या हिऱ्याच्या तुकड्यात आणखी एक हिरा आहे. ते हृदय आतून धडधडत असल्यासारखे भासतात. यामुळे याला बीटिंग हार्ट असे नाव देण्यात आलं आहे. हा दुर्मिळ हिरा सुरतच्या व्हीडी ग्लोबलने शोधला आहे. या कंपनीला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 0.329 कॅरेटचा हिरा मिळाला होता. ज्वेलरने हिरा पाहिल्यावर तोही थक्क झाला.
ज्वेलरने या दुर्मिळ हिऱ्याकडे पाहिले आणि या हिऱ्याच्या आत आणखी एक हिरा असल्याचे त्याला आढळले. तो आतला हिरा मुक्तपणे आत फिरत असल्याचे दिसते. यानंतर या हिऱ्याला बीटिंग हार्ट डायमंड असे नाव देण्यात आलं. हा हिरा दुर्मिळ हिऱ्यांचाच एक भाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यात मॅट्रियोष्का नावाच्या हिऱ्याचाही समावेश आहे. अशा प्रकारचा पहिला हिरा रशिया आणि सायबेरियामध्ये सापडला होता.

























































