अंबाजोगाईजवळ भीषण अपघातात 7 जण ठार, 11 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंबाजोगाई-लातूर हायवेवर नंदगोपाल दूध डेअरी समोर आज सकाळी क्रूझर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. लातूर तालुक्यातील आर्वी येथून क्रूझरने राडी येथे आयोजित मावद्यांच्या कार्यक्रमाला निघालेल्या क्रूझर गाडीला ट्रकने समोरासमोर धडक दिल्याने क्रूझरमधील 7 जण जागीच ठार झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे तर 10 जण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी रक्तामासांचा चिखल झाला आहे.

क्रूझर गाडीमध्ये 18 प्रवासी होते. जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व मृतदेह स्वाराती रूग्णालयामध्ये आणण्यात आले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की क्रूझर गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल झाला. स्वाराती रूग्णालयातही मयताचे नातेवाईक दाखल झाले आहेत. अत्यंत शोकाकुल परिस्थिती रूग्णालयाच्या परिसरामध्ये निर्माण झाली आहे.