बीड इलेक्शन स्कॅण्डल; चौकशीसाठी पाच अधिकाऱ्याचे पथक नियुक्त

1515

बीड लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निडणूकीमध्ये निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणाच गैरव्यवहार झाला आहे. मंडपापासून फाईलच्या दोरीपर्यंत पत्येक गोष्टीत अधिकाऱ्याच्या संगनमताने गैरव्यवहार झाला आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी चौकशीसाठी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नेमले आहे. 24 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्यास पथकाला सांगण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात पथक चौकशीच्या कामाला लागणार आहे. चौकशी होणार असल्याने घोटाळेबाज अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

बीडमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी संगनमत करत निवडणूक निधीचा अपहार केला. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी उभारलेल्या मंडपाचे बिल तब्बल 9 कोटी रुपये आकारण्यात आले. मतदारांच्या जनजागृती आणि बॅनरसाठी 55 लाखांचा खर्च दाखवण्यात आला. तर स्टॅपलर, स्टॅपलरच्या पिना, फाईल, दोऱ्या या छोट्या खरेदीतही 50 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याचा सतत पाठपुरावाही करण्यात आला.निवडणूक आयोगाचे आवर सचिव यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शुक्रवारी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक चौकशीसाठी नियुक्त केले आहे. या समितीला 24 जानेवारीपर्यंत स्वत:च्या अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसात हे पथक चौकशीच्या कामाला सुरुवात करणार आहे. या सर्व घोटाळ्याची पारदर्शक चौकशी केली जाणार असल्याने घोटाळेबाज अधिकाऱ्चे धाबे दणाणले आहे.

पथकामधील वरिष्ठ अधिकारी
आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी नेमलेल्या पथकामध्ये पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. हिंगोलीचे अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मणियार हे पथकाचे प्रमुख असणार आहेत. जालन्याचे रोहयोचे उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, धाराशिवचे नायब तहसीलदार चेतन पाटील, वरिष्ठ कोषागार कार्यालय संभाजीनगरचे सहाय्यक संचालक सचिन धस, संभाजीनगरचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र तारो यांचा पथकात समावेश असणार आहे.

गरज भासल्यास उच्च न्यायालयात धाव
बीड निवडणूक विभागाने निवडणुकीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरकारभार झाला आहे. या गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पथकही नियुक्त करण्यात आले आहेत. या चौकशीतून अधिकाऱ्यांनी केलेला घोटाळा आणि चुकीचे धोरण स्पष्ट होणार आहे. गैरव्यवाहाराच्या चौकशीतून स्पष्टता समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई होईल त्यासाठी आपण वेळप्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेऊ असे अ‍ॅड. अजित देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या