बीडमध्ये साजरा होणार अनोखा कृष्णजन्मोत्सव

611

सामना प्रतिनिधी। बीड

उमरखेड संस्थान चे प पु माधवानंद महाराज यांच्या बीडमध्ये कृष्णजन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जाणार आहे. विश्वंभराच्या दरबारात जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. भक्तांसाठी हा अनोखा योग ठरणार आहे.

प पु माधवानंद महाराजाच्या चातुर्मासाने बीड भक्तिमय झाले आहे, राज्यभरातून शिष्यगण दर्शनासाठी रिघ लावत आहेत, रोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत, बीड चा चातुर्मास भव्यदिव्य होत आहे, महादेवाचे उपासक असणाऱ्या उमरखेड संस्थान विश्वाभराच्या दरबारात यंदा ही कृष्णजन्म भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे, गोकुळाष्टमीच्या दिवशी दर्शन , आरती, महाप्रसाद , कृष्णजन्मोत्सव, महिलांचा दांडिया, व रात्री कीर्तन होणार आहे, कृष्णजन्मोत्सवाचा अनोखा योग चातुर्मास स्थळी पार पडणार आहे. यावेळी बाहेर गावावरून येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या