देवस्थानच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालणाऱ्या उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचे निलंबन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवस्थानाच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचे पाप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापूर्वीच गुन्हे दाखल झाले आहेत. आज शासनाने मोठी कारवाई करत ठोस पावले उचलली आहेत. जमिन घोटाळा प्रकरणामध्ये समावेश असलेले उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याला आज अखेर निलंबित करण्यात आले आहे. शासनाने काढलेल्य या आदेशाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. शेकडो एकर जमिन अधिकाऱ्याच्या मदतीने बिल्डरांनी घशात घालण्याचे काम केले. या प्रकरणी आष्टी तालुक्यात तीन गुन्हे दाखल झाले तर शिवाजीनगर पोलिसातही एक गुन्हा दाखल झाला होता. जमिन घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. एसआयटीची चौकशी सुरू असताना जमिन घोटाळ्यात हात असणाऱ्या उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांनी अनियमितता केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी शाासनाकडे दिला होता. या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याला निलंबित करण्यात आले आहे. जमिन घोटाळा प्रकरणाची ही मोठी कारवाई समजली जाते. शासनाच्या या आदेशाने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.