बीडमध्ये उभारले जाणार अद्यावत सुविधेचे मराठा क्रांती भवन

ग्रामीण भागातील होतकरू आणि शिक्षणाची आस असणाया विद्याथ्र्यांच्या सोयीसाठी बीडमध्ये अद्यावत सुविधेचे मराठा क्रांती भवन उभे राहत आहे. या भवनासाठी बीडच्या नगर पालिकेने दर्जेदार जागा उपलब्ध करून दिली आहे. त्या जागेचे हस्तांतरण आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.

बीडमध्ये मराठवाड्यातील पहिले मराठा क्रांती भवन उभे राहत आहे. सखल मराठा विकास संस्थेने मराठा क्रांती भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आग्रह नगर पालिकेकडे केला होता. त्यासाठी आवश्यक असणारी जागा नगर पालिकेने उपलब्ध करून दिली. या जागेचे हस्तांतरण आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते, डॉ.भारतभूषण क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, डॉ.अनिल बारकुल यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बोलत होते. ते बोलताना म्हणाले, मराठा समाज नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे. या समाजाच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. मात्र खारीचा वाटा उचलण्याचा आमचा प्रयत्न आहे. बीडमध्ये उभारण्यात येणारे मराठा क्रांती भवन पुढच्या असंख्य पिढीच्या स्वप्नाला आकार देणारे ठरेल, विद्येची आणि विज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम या वास्तूच्या माध्यमातून केले जाईल असा विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनीही भाषण केले. या कार्यक्रमाला शहरातील मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या