
बीड तालुक्यातील इमामपूर येथे 10 सप्टेंबर रोजी भाटसांगवी येथील जयराम बोराडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्यांच्यासोबत असलेली चार वर्षांची चिमुकली बेपत्ता झाली होती. गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी सकाळी बीड तालुक्यातील रामगड परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरूणांना एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.