बेन स्टोक्स न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल हिंदुस्थानात सुरू आहे. पण या स्पर्धेमुळे इंग्लंडला धक्का बसला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीत राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करीत असताना अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली. आता त्याच्या बोटावर शस्त्र्ाक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला तीन महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. 2 जूनपासून सुरू होणाऱया न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळू शकणार नाही. 1

बेन स्टोक्सच्या बोटाचा एक्स रे व सिटी स्कॅन रिपोर्ट गुरुवारी आला. त्याच्या बोटाला जास्त दुखापत झाली आहे हे त्या रिपोर्टमधून समजले. आता सोमवारी इंग्लंडला रवाना होणार आहे. लीडस् येथे त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून शुक्रवारी देण्यात आली. बेन स्टोक्सच्या दुखापतीचा फटका राजस्थान रॉयल्सलाही बसला आहे. त्याच्या अनुपस्थितीत आता राजस्थान रॉयल्सला आयपीएलचा उर्वरित मोसम खेळावा लागणार आहे