
महिलांना नेहमीच सांगितले जाते, की घराबाहेर पडणे किंवा एकट्याने प्रवास करणे हे त्यांच्यासाठी सुरक्षित नाही. हे जग त्यांच्यासाठी सुरक्षित नाही. तसेच हे जग एकटीने भटकण्यासाठी चांगले ठिकाण नाही. परंतु या सर्व जुनाट पुसाट कल्पना असून, आता मात्र जग झपाट्याने बदलू लागलेले आहे. पूर्वी एकटीने प्रवास करणे हा एक मोठा धोका मानला जात होता, पण आता तो महिलांसाठी एक ताकद बनला आहे. एखादी महिला एकटी प्रवास करते तेव्हा ती स्वतःची जबाबदारी घेते. नवीन भाषा असो, नवीन शहर असो किंवा वाटेत येणारी समस्या असो, ती घाबरत नाही तर तिला तोंड द्यायला शिकते. या छोट्या गोष्टी तिला आतून मजबूत बनवतात. महिलांसाठी एकट्याने प्रवास कसा फायदेशीर आहे, हे जाणून घेऊया.

एकटीने प्रवास करण्याचा फायदा असा आहे की, त्यामुळे महिलांना स्वतःसोबत वेळ घालवता येतो.
ऑफिसचा ताणतणाव घरातील जबाबदाऱ्या आणि इतर लोकांच्या अपेक्षा यांच्यात, अनेकदा स्वतःचे ऐकण्यासाठी वेळ मिळत नाही.

एकटीने प्रवास करताना, प्रवासाची भीती हळूहळू कमी होते. तसेच स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःसाठी एखादी गोष्ट करताना, आपण आनंदी राहणे हेही महत्त्वाचे आहे. ही जाण निर्माण होते, त्यामुळे आत्मविश्वासही वाढतो.

एकट्याने प्रवास केल्याने केवळ जगावरच नव्हे तर स्वतःवरही विश्वास वाढतो. जेव्हा एखादी स्त्री नवीन रस्त्यांवरून मार्ग काढते किंवा घाबरून न जाता अचानक येणारी समस्या सोडवते तेव्हा तिला आतून खूप ताकद वाटते.

महिलांमधील हा वाढलेला आत्मविश्वास आणि ताकद ही नातेसंबंध आणि दैनंदिन निर्णयांमध्ये दिसून येते. भावनिकदृष्ट्या महिला अधिकाधिक खंबीर होऊ लागतात.
तुम्ही पहिल्यांदाच सोलो ट्रॅव्हल करताय! मग या गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवा..



























































