
केंद्रीय गुन्हे ब्रँच (सीसीबी)च्या नाकाxटिक्स पंट्रोल विंगने अंमलीपदार्थ प्रकरणात मोठ ाr कारवाई करत एका महिलेसह दोन तस्करांना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून 8,335 एलएसडी स्ट्रिप, 534 ग्रॅम चरस आणि 5 किलो हायड्रो गांजा जप्त केला आहे. या सर्व अंमलीपदार्थांची बाजारात अंदाजित किंमत 11.50 कोटी रुपये आहे, असे सांगितले जात आहे. आरोपी गेल्या वर्षभरापासून बंगळुरूत राहात असून केरळच्या एका व्यक्तीद्वारा ड्रग्ज सप्लाय करत होते, अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे.



























































