
बेस्टच्या चालकाला बस चालवतानाच अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचा बाका प्रसंग फ्री प्रेस जर्नल मार्गावरून चर्चगेट येथे येणार्या मार्ग क्र. 100 च्या बसमध्ये सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला. छातीत कळ येताच प्रवाशांनी भरलेली ही बस चालक नथुराम शिंदे यांनी लागलीच रस्त्याच्या कडेला नेऊन थांबवली आणि एका पादचार्याकडे मदत मागितली तेव्हा 108 ऍम्ब्युलन्सवर कॉल येताच तातडीची मदत मिळाल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही बस नव्याने सुरू केलेल्या ‘विनावाहक’ म्हणजेच कंडक्टर नसलेली फिडर रूटवाली बस होती असे सूत्रांनी सांगितले.


























































