10 हजार फुकटय़ा प्रवाशांकडून 7 महिन्यांत 7 लाखांचा दंड वसूल, ‘बेस्ट’ प्रशासनाची धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बेस्ट’मधील फुकटय़ा प्रवाशांकडून प्रशासनाने चांगलाच दंड वसूल केला आहे. जानेवारी ते जुलै 2021 या 7 महिन्यांत 10 हजार 632 फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करत 7 लाख 5 हजार 992 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. बेस्ट बसमध्ये विनातिकीट किंवा अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱयांविरोधात बेस्ट परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो.

विनातिकीट प्रवास करणाऱया प्रवाशांविरुद्ध उघडण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जानेवारी ते जुलै 2021 या 7 महिन्यांच्या कालावधीत एकूण 10,632 प्रवासी विनातिकीट आढळले असून त्यांच्याकडून 7 लाख एवढी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली.

विनातिकीट प्रवास टाळा!

बसमधून प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे हे प्रत्येकास बंधनकारक असून विनातिकीट प्रवास करणे हा सामाजिक गुन्हादेखील आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान आणि मानहानी टाळण्याकरिता योग्य तिकीट अथवा वैध बस पास घेऊन, तिकीट व बस पासवर प्रमाणित केल्याप्रमाणे प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे नियमितपणे करण्यात येत आहे.