बेस्टच्या संपाचा आज फैसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेतन करार आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबत बेस्ट प्रशासन व बेस्ट वर्कर्स युनियन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेच्या फेऱ्यांमधून तोडगा न निघाल्याने बेस्टच्या संपाबाबत शुक्रवारी मतदान घेण्यात आले. त्याची उद्या शनिवारी मोजणी होऊन त्यानंतर संपाविषयी फैसला होणार आहे.
बेस्टच्या ऐतिहासिक तिकीट दरकपातीनंतर बेस्टमध्ये प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच बेस्टला दरमहिन्याला अनुदान देण्याबरोबरच बेस्टचे कर्जही फेडण्याचे वचन मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहे. त्यातच 2016 पासून रखडलेला वेतन करार आणि इतर देण्यांसंदर्भात बेस्ट वर्कर्स युनियनने संपाची हाक दिली आहे. आज यासंदर्भात कामगारांचे मतदान घेण्यात आले. या मतांची मोजणी उद्या शनिवारी परळ येथील शिरोडकर हायस्कूल येथे होणार आहे. त्यानंतर दुपारी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीची बैठक होणार आहे.