
तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’चा कॉल आला तर घाबरू नका. ही एक मोठी फसवणूक आहे. कोणतीही सरकारी यंत्रणा पह्नवर अटक करत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही.
त्यामुळे कॉल लगेच कट करा. कोणालाही ओटीपी, पिन नंबर किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका, कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
त्वरित सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा. तुमच्या बँकेशी किंवा कुटुंबाशी संपर्क साधून माहितीची पडताळणी करा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे घाबरू नका, शांत राहा, विचार करा. अधिकारी पह्नवर असे करत नाहीत. धमकावून पैसे मागितल्यास अजिबात देऊ नका.
डिजिटल अरेस्ट हा ड्रग्ज किंवा मनी लॉण्डरिंगच्या आरोपाखाली फसविण्यासाठी वापरला जातो, ज्यात व्हिडीओ कॉलद्वारे तुम्हाला भीती दाखवली जाते.





























































