
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार चंद्रशेखरन जोसेफ विजय यांच्या टीव्हीके TVK) पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर राष्ट्रीय राजकारणातूनही त्यांचे अभिनंदन केले जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विजय यांना फोन करून आणि X पोस्ट द्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. राहुल गांधींच्या या शुभेच्छांना विजय यांनी आता अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले थलपती विजय?
राहुल गांधींच्या शुभेच्छांना उत्तर देताना विजय यांनी X पोस्ट करत म्हटले आहे की, “लोकसभेतील सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी फोन करून दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. सार्वजनिक सेवेतील उत्कृष्टता आणि आपल्या राज्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, ज्यासाठी सामूहिक सहकार्याची आवश्यकता आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन, आम्ही तामिळनाडूच्या जनतेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देऊ.”
याआधी राहुल गांधी यांनी आपल्या X पोस्टमध्ये विजय यांना शुभेच्छा देत म्हटले होते की, “मी थिरु विजय यांच्याशी संवाद साधला आणि टीव्हीकेच्या निकालासाठी त्यांचे अभिनंदन केले. हा जनादेश तरुणांच्या वाढत्या आवाजाचे प्रतिबिंब आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि केले जाणार नाही.”
My sincere thanks to the Honorable Leader of the Opposition in the Lok Sabha for the call and kind wishes! We shall remain committed to excellence in public service, and preserving the cultural ethos of our state which requires collective cooperation. Beyond politics, we shall… https://t.co/dohAfUSq0e
— TVK Vijay (@TVKVijayHQ) May 5, 2026




























































