भंडारा दुर्घटनेबाबत रविवारी अहवाल सादर होणार, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची माहिती

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटमधील आग प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती सखोल चौकशी करीत आहे. या समितीला चौकशीसाठी आणखी थोडा कालावधी लागणार  असून ही समिती येत्या रविवारी आपला अहवाल सादर करेल अशी माहिती आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.

आगीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकारी यांना व्हीसीद्वारे सुरक्षा विषयक ऑडिट तातडीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेच स्थानिक अग्निशमन यंत्रणा व संबंधित विद्युत विभाग यांनी देखील आपल्या क्षेत्रातील शासकीय रुग्णालयांना नियमितपणे भेटी देऊन वीज व अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित आहे का याची तपासणी करीत जावी अशी सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या