
भांडुपमध्ये महिनाभरात आज पाचव्यांदा जलवाहिनी फुटल्याने भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम परिसरात बुधवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला. यावेळी भांडुप पश्चिम येथील क्वॉरी रोड भागात ही जलवाहिनी फुटली असून जल विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून येथे ‘माईल्ड स्टील’ पद्धतीची नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
घाटकोपर ते भांडुप पश्चिम परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी 2005 मध्ये ही 900 मिमी व्यासाची जीआरपी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी मंगतराम पेट्रोल पंप, क्वॉरी रोड भागात वारंवार फुटते आहे. गेल्या वर्षभरात पाच ते सहा वेळा ही जलवाहिनी फुटली होती. त्यानंतर मागील महिन्यात सप्टेंबरमध्ये 5, 10, 19, 22 रोजी आणि बुधवारी 12 ऑक्टोबर रोजी ही जलवाहिनी पुन्हा फुटली आहे. त्यामुळे लाल बहादूर शास्त्र्ााr मार्ग विक्रोळी पश्चिम, विक्रोळी पार्क साईट व लोअर डेपो पाडा पंपिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा होणारे इतर विभाग आणि वीर सावरकर मार्ग, विक्रोळी स्टेशन रोड, लाल बहादूर शास्त्र्ााr मार्ग घाटकोपर पश्चिम, वाधवा, कल्पतरू, दामोदर पार्क, साईनाथ नगर रोड, गार्डन लेन, संघांनी इस्टेट, भांडुप, कांजुरमार्ग येथील विविध विभागांसह परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.






























































