
मुंबईला 50 टक्के पाणीपुरवठा करणाऱया भातसा धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना आता लवकरच मुंबई महानगरपालिकेची नोकरी मिळणार आहे. यामध्ये 28 प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या अर्हता-पात्रतेनुसार वर्ग-3 आणि वर्ग-4 च्या पदांसाठी नोकरीमध्ये संधी देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या आगामी महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार असून यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
मुंबईला विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि भातसा तलावातून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यामधील पालघर जिह्याच्या शहापूर तालुक्यात असणाऱया एकटय़ा भातसा तलावातून तब्बल 50 टक्के पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठय़ाचा विचार करता भातसा धरणाचा महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठा वाटा आहे. असे असताना या धरण परिसरातील रहिवासी दुर्गम व डोंगराळ भागात राहत असून त्यांना रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने ते हलाखीचे जीवन जगत आहेत. या परिसरातील जमीन जंगल आणि नापीक असल्याने आणि उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने भातसा प्रकल्पग्रस्त पालिकेकडे रोजगाराची मागणी करीत होते. शिवाय स्थानिकांच्या जमिनी बुडित क्षेत्रात गेल्याने शेतीचा व्यवसायही गमावून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर भातसा प्रकल्पग्रस्त असणाऱया 28 कुटुंबातील प्रत्येकी एकाला महापालिकेची नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, 3 एप्रिल 2008च्या ठराव क्र. 10 नुसार फक्त प्रकल्पग्रस्तांनाच पालिकेच्या सेवेत सामावून घेतले जात होते. मात्र 23 जुलै 2019 च्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबईला होण्याऱया पाणीपुरवठय़ात 50 टक्के वाटा असणाऱया प्रकल्पातील बाधितांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अशी होणार अंमलबजावणी
- ज्यांची 20 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जमीन प्रकल्पासाठी गेली आहे, जिल्हाधिकाऱयांनी प्रकल्पबाधित म्हणून घोषित केले आहे त्यांनाच लाभ.
- कायदेशीररीत्या कोणत्याही राखीव जागांच्या तरतुदी आणि पदांच्या अधीन राहून प्रकल्पबाधित व्यक्तीने पुटुंबातील नामनिर्देशित केलेल्या एकालाच नोकरी दिली जाईल.
- प्रकल्पबाधित कुटुंबाच्या व्याख्येत बाधित व्यक्तीचा विवाहसाथी, तिच्यावर अवलंबून असणारा तिचा मुलगा, विवाहित-अविवाहित मुलगी किंवा भाऊ बहीण, सून-नातू-नात किंवा दत्तक मुलगा यांचा समावेश.
- 28 प्रकल्पग्रस्तांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमधील एकालाच आणि एकदाच नोकरी देण्यात येईल.
आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आझाद मैदानात येथे गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी आदिवासांनी आपले पारंपरिक वेष परिधान करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बहुचर्चित खावटी योजनेचा लाभ द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.



























































