भीम आर्मीबद्दल फेक न्यूज, चंद्र शेखर आझाद यांचा दोन वृत्तवाहिन्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हाथरस बलात्कार प्रकरणी संपूर्ण देशात गदारोळ निर्माण झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये दलितांसाठी काम करणाऱ्य़ा भीम आर्मीबद्दल दोन हिंदी वृत्तवाहिन्यांनी फेक न्यूज चालवली असा दावा भीम आर्मीचे प्रमुख चंद्र शेखर आझाद यांनी केला आहे. तसेच या दोन्ही वाहिन्यांविरोधात आपण 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असे आझाद यांनी जाहीर केले आहे.


हाथरस बलात्कारानंतर चंद्र शेखर आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पण चंद्र शेखर आझाद हे उत्तर प्रदेशमध्ये जाती दंगली घडवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त झी न्युज आणि न्युज 18 हिंदी या दोन वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले होते. तसेच भीम आर्मीला परदेशातून निधी मिळतो असाही आरोप या वाहिन्यांनी केला होता. त्यावर चंद्रशेखर आझाद यांनी ट्विट करून आक्षेप नोंदवला आहे. भीम आर्मी बहुजन समाजाचा गौरव आहे, या दोन वाहिन्यांनी फेक न्युज चालवली यांच्याविरोधात आपण 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. स्वाभिमानाशी कुठलीच तडजोड आपण करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.