
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर नक्षलवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयारून पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी तर हा देश हुकूमशाहीच्या वाटेवर आहे, असे म्हटले आहे.
This country is moving towards dictatorship. The arrests of the five intellectuals show that the country is moving towards emergency and I condemn it: Former Bihar CM Lalu Prasad Yadav. #BhimaKoregaon pic.twitter.com/RB3jh6tRFw
— ANI (@ANI) August 29, 2018
एएनआयशी बोलताना लालूप्रसाद यादव म्हणाले की, ‘हा देश हुकूमशाहीच्या वाटेवर आहे. पाच विचारवंतांच्या अटक स्पष्ट करते की ही आणीबाणीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि मी त्याचा निषेध करतो.’
दरम्यान, पुणे पोलिसांनी वरवरा राव, अरुर परेरा, गौतम नवलखा, वर्णन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.





























































